top of page
Writer's pictureMahannewsonline

'हिंदुस्थानी भाऊ'ला अटक

सोमवारी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाइन घ्यावी यासाठी हिंसक निदर्शनं केली. सोशल मीडिया स्टार हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकने दिलेल्या चिथावणीमुळे हे विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते आणि पाहतापाहता आंदोलन हिंसक झाले. या प्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांची माथी भडकावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊसह आणखी एकाला अटक केली आहे.

विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हिंदुस्थानी भाऊने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही व्हिडीओ अपलोड केले होते. यामध्ये त्याने विद्यार्थ्यांना आंदोलनास प्रवृत्त केलं.

दहावीची परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांना करण्यासाठी ‘हिंदूस्थानी भाऊ’ धारावीत आला आणि त्याच्या समर्थनासाठी मोठय़ा संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी अंडी, दगड, चपला फेकण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हुल्लडबाजीमुळे परिस्थिती चिघळू लागली. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून विद्यार्थ्यांना पांगवले.


bottom of page