top of page
Writer's pictureMahannewsonline

"या" जिल्ह्यातील १०६ गावांमध्ये प्रवेशबंदी

सध्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता अमरावती जिल्हा प्रशासनाने रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या गावांना सील केले आहे. जिल्ह्य़ातील १४ तालुक्यांमध्ये अशा १०६ गावांची यादी महसूल विभागाने तयार केली असून या १०६ गावांमध्ये बाहेरील नागरिकांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्य़ात दररोज सरासरी ९०० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या नंतरही रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसून येत नाही. त्यामुळे आता ज्या गावांमध्ये अधिक करोना रुग्ण आहेत. अशा गावांमध्ये मात्र बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्याबाबतचे आदेश महसूल विभागाने काढले आहेत. त्यानुसार १०च्या पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांमध्ये बाहेरील नागरिकांना सीमेवरच थांबवण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहे. गावांतील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे.

गृहविलगीकरणातला रुग्ण घराच्या बाहेर आढळल्यास त्याला २५ हजाराचा दंड होणार आहे. अतिमहत्त्वाच्या कामासाठी ये-जा करणाऱ्या लोकांची नोंद घेतली जात असून गावांतील सर्व दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याची खबरदारी घेण्यात येत आहे.


bottom of page