top of page

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीला भीषण अपघात

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. आज पहाटे मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात मेटे हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता मुंबईतील एमजीएम रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते. विनायक मेटे यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

आज पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडहून मुंबईकडे जात होते. यावेळी पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला एका मोठ्या गाडीने डाव्या बाजून धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.



  “आम्ही बीडवरून मुंबईकडे येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकनं कट मारला. ट्रकच्या बंपरमध्ये आमची गाडी अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. आमचा अपघात ५ वाजता झाला. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आली”, असं त्यांच्या गाडीचे चालक एकनाथ कदम यांनी सांगितलं आहे. 

मराठा आरक्षणासाठी त्यांचे मोठे योगदान होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने गेली अनेक वर्षे त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून योगदान दिले होते.

.


bottom of page