top of page

Viral Video: बाईकवर एक-दोन नाही तर तब्बल ७ जण; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

16सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती तीन-चार नव्हे तर तब्बल सात जणांना बसवून बाईक चालवत आहे. कोणीतरी त्याचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला, जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आधी एक व्यक्ती त्याच्या बाईकवर बसतो आणि दोन मुलांना त्याच्यासमोर बसवतो. यानंतर एक महिला पुरुषाच्या मागे बसते व मांडीवर एका मुलाला घेते. यानंतर दुसरी महिलादेखील मांडीवर मुलाला घेऊन बसते. म्हणजेच दुचाकीवर ४ मुले, २ महिला आणि पुरुष असे एकूण ७ जण बसले आहेत. कोणीतरी त्याचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर theadulthumour नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून काही तासातच हा व्हिडिओ व्हायरल झाला.



bottom of page