top of page

Video: चालत्या रिक्षातून चिमुकला रस्त्यावर पडला; त्याचक्षणी वेगात बस आली अन्...

सोशल मिडियावर अनेकजण व्हिडिओ शेअर करतात. त्यातील काही व्हिडिओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. प्रशासकीय सेवा अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'ट्रैफ़िक पुलिस के जवान सुंदर लाल.'.असं कॅप्शन लिहून अवनीश शरण यांनी हा व्हिडिओ शेअर केला. आतापर्यंत १.५ मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, ८१ हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत सुंदरलाल यांची स्तुती करत आहेत. हा व्हिडिओ नेमका कोणत्या शहरातील आहे, हे मात्र समजू शकले नाही.

या व्हायरल व्हिडिओत एका चौकात कारला ओव्हरटेक करत असताना रिक्षाचालकाने रिक्षा जोरात वळवल्याचे दिसते. त्यामुळे रिक्षात बसलेला मुलगा रस्त्यावर पडतो. त्याचक्षणी एक बस वेगात मुलाच्या दिशेने येत आहे, हे पाहून सुंदरलाल हे सतर्कता दाखवत मुलाचा जीव वाचवतात व मुलाला त्याच्या आईकडे देतात.


bottom of page