top of page
Writer's pictureMahannewsonline

मुलासोबत आईने केला अश्लील डान्स; व्हायरल व्हिडिओची महिला आयोगाने घेतली दखल

Updated: Jul 21, 2021

नवी दिल्ली: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोकं कोणत्याही थराला जाऊ शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलाबरोबर अश्लील नृत्य केलं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओची दिल्ली महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. त्यात आपल्या छोट्या मुलासोबत आई अश्लील डान्स आणि अभिनय करताना दिसत आहे. संबंधित महिलेचे इन्स्टाग्रामवर तब्बल १ लाख ६० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला. सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेल्यानंतर हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे.

दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणी पोलिसांना नोटीस पाठवली असून, संबंधित महिलेविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारचा व्हिडिओ तयार करून मुलाला वाईट शिकवण दिली जात आहे. आई-मुलाच्या पवित्र नात्यालाही यातून कलंक लागला आहे. आईकडूनच अशी शिकवण मिळालेला मुलगा पुढे जाऊन मुलींबद्दल कशा प्रकारचे विचार करील, याची कल्पनाच केलेली बरी. तसंच, या मुलाच्या मनामध्ये पुढे जाऊन अपराधी भावनाही तयार होऊ शकते, असं दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी म्हटलं आहे.


आपल्या मुलावर चांगले संस्कार करण्याची गरज असताना इथे संबंधित मुलाची आईच त्याच्यासोबत अश्लील व्हिडिओचं शूटिंग करत आहे. ही लाजिरवाणी आणि गंभीर गोष्ट आहे. असं महिला आयोगाचं म्हणणं आहे. तसंच संबंधित मुलाचं समुपदेशन आणि पुनर्वसन करण्याबद्दलही पोलिसांना सांगण्यात आलं आहे. चांगलं काय आणि वाईट काय, यातला फरक मुलाला कळला पाहिजे.


bottom of page