top of page
Writer's pictureMahannewsonline

बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना अटक

पनवेलः कर्नाळा बँकेच्या ५२९ कोटीच्यातील घोटाळ्याप्रकरणी प्रमुख आरोपी असलेले बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ईडीने विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. ईडीने या कारवाई दरम्यान पाटील यांच्या घराचीही झाडाझडती घेतल्याची सूत्रांची माहिती आहे

पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बॅकेत ५० हजार ६८९ ठेविदारांच्या ५२९ कोटीच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेच्या सुरूवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बॅकेत गैरव्यवहार केला होता. मात्र, ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व गैरव्यवहार दडपण्यात आले होते.

रिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितपणा निदर्शनास आल्याने त्यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तातडीने रायगड जिल्हा विशेष लेखा परिक्षक यु. जी. तुपे यांची नियुक्ती करून पूर्नतपासणी केल्यानंतर ६३ कर्ज खात्याद्वारे ५१२ कोटीचा घोटाळा उघड झाला होता. त्यानंतर चौकशीत तो आकडा ५२९ कोटीवर गेला आहे.

पनवेल संघर्ष समितीने सहकार खाते, गृहखात्याच्या गुप्तवार्ता विशेष गुन्हे शाखा (सीआयडी) आणि ईडीच्या प्रमुखांना भेटून सखोल चौकशी आणि आरोपींच्या अटकेची मागणी करत पाठपुरावा केला होता. सहकार खात्याचे उपनिबंधक विशाल जाधववार यांनी दिलेल्या निर्णयावर पनवेल संघर्ष समितीने आक्षेप घेत पूर्नचौकशीची मागणी सहकार सचिवांकडे केली आहे. सीआयडीच्या उपअधिक्षक सरोदे यांच्याकडे तगादा लावल्यानंतर त्यांनी विवेक पाटलांसह, अभिजित पाटील आणि सावंत यांची वाहने जप्त करण्याची कारवाई केली होती.

राज्याच्या ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशिल कुमार यांची भेट घेवून संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी कर्नाळा बँकेच्या प्रारंभापासूनच्या व्यवहाराची चौकशी करून संबंधित घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सुशिल कुमार यांनी गुन्ह्याचा तपास झोन-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांच्याकडे सोपविला होता.

bottom of page