Viral Video : मम्मी पप्पांचा पूर्ण पगार घेऊन त्यांचं ऐकत नाही अन् सरकारला वाटतं...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये देण्याची घोषणा केल्यामुळे महिला खरंच याच नेत्यांना पुन्हा निवडून आणणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. सोशल मीडियावर यावरून अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Video पाहा
या व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकली सांगते, “इथे आमची मम्मी पप्पांचा पूर्ण पगार घेऊन त्यांचं काहीही ऐकत नाही.. आणि इथं सरकारला वाटतंय की १५०० रुपयांमध्ये त्यांचं ऐकेल. ना बाबा ना.. कठीण आहे.” चिमुकलीचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.