top of page
Writer's pictureMahannewsonline

वर्धा: होमगार्ड पदासाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द; 29 ऑगस्ट पर्यंत घेता येणार आक्षेप

वर्धा जिल्ह्यातील रिक्त असलेल्या वर्धा, आर्वी व हिंगणघाट पथकातील 127 रिक्त पदासाठी दि. 23, 24 व 26 ऑगस्ट रोजी होमगार्ड पदाची मैदानी व तांत्रिक अर्हता प्राप्त असलेल्या उमेदवारांची यादी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादीवर उमेदवारांना आक्षेप किंवा हरकती असल्यास पुराव्यानिशी दि.29 ऑगस्ट रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत लेखी स्वरुपात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिर केलेल्या यादीतील उमेदवारांचे त्यांचे नावासमोर नमुद वय, शिक्षण, जन्म तारीख, तांत्रिक गुण, मैदानी चाचणी गुण, पत्ता, पथक, पोलीस स्टेशन ह्या बाबत काही आक्षेप नोंदवायचा असल्यास आपला आक्षेप लेखी स्वरुपात स्वत:चे नाव, अर्ज नोंदणी क्रमांक, चेस्टक्रमांक व मोबाईल क्रमांकासह स्पष्टपणे आक्षेपाचे कारणासह व योग्य पुराव्यानिशी होमगार्ड कार्यालय येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावा. त्यानंतर प्राप्त झालेल्या आक्षेपाची नोंद घेतली जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा समादेश, होमगार्ड डॉ. सागर कवडे यांनी कळविले आहे.

bottom of page