top of page
Writer's pictureMahannewsonline

वर्धा जिल्ह्यात निर्बंध शिथिल; वाचा सविस्तर : सोमवारपासून काय सुरु काय बंद?

नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून उद्योग व्यवसाय करावा - जिल्हाधिकारी

मॉल्स, चित्रपटगृहे, नाटयगृहे पुर्णपणे बंद

वर्धा :- शासनाने 4 जुन रोजी दिलेलया निर्देशानुसार वर्धा जिल्हयातील कोविड सकारात्मक अहवाल असलेल्या रुग्णांची टक्केवारी 7.57 टक्के असुन व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी 4.04 टक्के असल्याने वर्धा जिल्हा लेवल तिन (3) मध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,अध्यक्ष प्रेरणा देशभ्रतार यांनी वर्धा जिल्ह्यातील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल केले आहेत. सदर निर्बंध वर्धा जिल्हयाकरीता 7 जून रोजी सकाळी 7 वाजे पासुन पुढील आदेशापर्यंत शिथिल करण्याचे आदेश पारीत केलेआहे. नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून उद्योग, व्यवसाय करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

सुरू करण्यात आलेली दुकाने

  • अत्यावश्यक वस्तु व सेवा संबधी व्यवसाय व दुकाने दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजे

  • पर्यंत

  • अत्यावश्यक वस्तु व सेवा व्यतिरिक्त इतर सर्व व्यवसाय व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजे पर्यंत

  • रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4.00 या वेळेत 50 टक्के आसन क्षमतेनुसार डाईन-इन व शनिवार आणि रविवार फक्त पार्सल व घरपोच सुविधा.

  • सार्वजनिक ठिकाणे क्रिडांगणे, मोकळ्याजागा. उद्याने, बगीचे, मॉर्निंग व इव्हीनिंग वॉक, सायकलिंग दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 वाजे पर्यंत.

  • खाजगी आस्थापना

  • सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत

  • अपवाद - खाजगी बँका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्म वित्त संस्था व गैर बँकींग वित्त संस्था यांची कार्यालये नियमीतपणे सुरु राहतील)

  • कार्यालयीन उपस्थिती

  • शासकीय/निमशासकीय/खाजगी - क्षमतेच्या 50टक्के (कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्थापना, कृषी, बँक, मान्सुनपुर्व कामांशी संबंधित यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत यंत्रणा, कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु राहतील)

  • क्रिडा व मनोरंजन

  • बाहेर मोकळया जागेत सकाळी 5 ते सकाळी 9 व सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत.

  • सामाजीक, सांस्कृतीक कार्यक्रम

  • सोमवार ते शुक्रवार 50 टक्के उपस्थितीत (सभागृहाच्या क्षमतेच्या) सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत.

  • विवाह समारंभ

  • 50 लोकांच्या उपस्थितीत

  • अंत्यविधी

  • 20 लोकांच्या उपस्थितीत

  • सभा/निवडणुका,स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांचे आमसभा- क्षमतेच्या 50 टक्के

  • बांधकाम

  • फक्त इन-सितु किंवा बाहेरुन मजुर आणण्याचे

  • बाबतीत सायंकाळी 4 वाजेपर्यंत

  • कृषी संबंधीत बाबी

  • दररोज सायंकाळी 4 वाजेपर्यंत

  • ई-कॉमर्स वस्तु व सेवा --नियमीतपणे पुर्ण वेळ

  • (कोवीड विषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन)

  • जमावबंदी/संचारबंदी

  • जमावबंदी सायंकाळी 5वाजेपर्यंत, संचारबंदी सायंकाळी 5 नंतर.

  • जीम / सलुन / ब्युटी पार्लर / स्पा / वेलनेस सेंटर दररोज सायंकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह पुर्व परवानगीसह,वातानुकूलित वापरास मनाई.

  • सार्वजनिक बस वाहतुक

  • पुर्ण आसन क्षमतेने परंतु प्रवासींना उभ्याने प्रवास करण्यास मनाई आहे.

  • कार्गो वाहतुक सव्हीसेस (जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह) -- नियमीतपणे पुर्ण वेळ

  • (कोवीड विषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन)

  • आंतर जिल्हा प्रवासी वाहतुक

  • खाजगी कार,टॅक्सी,बस नियमीतपणे पुर्णवेळ

  • तथापी जर प्रवासी लेवल 5 मधील भागातुन येत असेल तर ई-पास आवश्यक.

  • उत्पादन क्षेत्र (निर्यात प्रधान उद्योग)

  • नियमीतपणे पुर्ण वेळ

  • (कोवीड विषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन)

उत्पादन क्षेत्र

अत्यावश्यक वस्तु व त्या करीता लागणारे कच्चा माल उत्पादक पॅकेजींग व संपुर्ण साखळीतील सेवा(कोवीड विषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन)

निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग,

संरक्षण संबधीत उद्योग.

डाटा सेंटर / क्लॉवुड सर्व्हिस प्रोवायडर /माहिती तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुतीचे पायाभुत सेवा व उद्योग - नियमीतपणे पुर्ण वेळ सुरू

उत्पादन क्षेत्र ( अत्यावश्यक सेवा व निरंतर प्रकिया उद्योग,निर्यात प्रधान उद्योग व इतर उत्पादन क्षेत्रातील

उद्योग व सेवा -- 50 टक्के स्टाफचे हालचालींचे परवानगीसह.

कोरोना चाचणी बंधनकारक

सर्व उद्योग, व्यवसाय व खाजगी आस्थापना व त्यांचे कर्मचाऱ्यांना निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. (वैधता 15 दिवसांकरीता) निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवालाशिवाय दुकान / व्यवसाय सुरु करता येणार नाही.

या नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना माहामारीच्या आपत्ती जोपर्यंत अस्तीत्वात आहे तो पर्यंत संबधीत दुकान बंद ठेवण्यात येईल, तसेच दंड आकारण्यात येईल.

सदर आदेशाचा आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 60 नुसार कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद केले आहे.


bottom of page