top of page
Writer's pictureMahannewsonline

सचिन वाझेंना कुर्ता घालून लावलं चालायला; घटनाक्रमाचे नाट्य रुपांतर

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरु आहे. एनआयएने सचिन वाझे यांना शुक्रवारी रात्री अंबानींचं निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर आणण्यात आलं होतं. या ठिकाणी नाट्य रुपांतर करत संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न एनआयएकडून करण्यात आला.

२५ फेब्रुवारीला अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ वाझे यांनी उभी केली, असा संशय ‘एनआयए’ला आहे. एनआयएने सचिन वाझे यांना स्कॉर्पिओ सापडली तिथपर्यंत चालायला लावसं. आधी सचिन वाझेंना शर्ट आणि पँटमध्ये चालायला सांगण्यात आलं. नंतर त्यांना कुर्ता आणि डोक्याला रुमाल बांधून चालायला लावण्यात आलं. सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती आणि सचिन वाझे यांच्यातील साधर्म्य तपासण्याचा प्रयत्न एनआयकडून करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. एनआयएने सचिन वाझे वापरत असलेल्या वाहनात गाडीची नंबरप्लेट सापडल्याचा दावा केला आहे. तसंच अँटिलियाबाहेर त्या रात्री सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचाही दावा आहे.


एनआयए आणि एटीएसच्या तपासात वाझे एकूण १२ महागड्या गाड्या वापरत असल्याचं उघडकीस आलं आहे.यापैकी दोन मर्सिडीज, एक लॅण्डक्रुजर प्रॅडो गाडी एनआयएने जप्त केली आहे. अन्य नऊ गाड्यांचा वाझे यांनी गुन्ह्यात वापर केला आहे का, याबाबत चौकशी-तपास सुरू आहे, असे एनआयएच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

bottom of page