top of page
Writer's pictureMahannewsonline

Video : पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला

पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर काही ठिकाणी हिंसाचार घडल्याची प्रकरणं समोर आली आहेत. या हिंसाराचाराच्या घटनांवरून भाजपाकडून ममता बॅनर्जी लक्ष्य केलं जात आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आज एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काही लोकं त्यांच्या ताफ्यावर हल्ला करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आपल्याला दौरा मध्येच सोडून परतावं लागल्याचं देखील व्ही. मुरलीधरन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

व्हिडिओमध्ये काही लोक व्ही. मुरलीधरन यांच्या गाडीवर आणि त्यांच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला करत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये मुरलीधरन यांच्या गाडीच्याही काचा फुटल्याचं व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. हा प्रकार घडल्यामुळे अर्ध्या वाटेतून त्यांच्या ताफ्याला माघारी परतावं लागलं. “पश्चिम मिदनापूरमध्ये तृणमूलच्या गुंडांनी माझ्या ताफ्यावर हल्ला केला. गाडीच्या काचा फुटल्या. माझ्यासोबतच्या कर्मचाऱ्यांवर देखील हल्ला झाला. त्यामुळे दौरा आटोपता घेण्यात आला”, असं या ट्वीटमध्ये मुरलीधर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी ४ सदस्यांच्या समितीची नेमणूक करण्यात आली आहे.


bottom of page