बंगालच्या उपसागरात भूकंप...
बंगालच्या उपसागरात आज सकाळी ९ च्या सुमारास भुकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केलवर होती.आतापर्यंत यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.
भूकंपाचा केंद्रबिंदू अंदमान आणि निकोबार बेटांच्या केंद्रशासित प्रदेशातील पारका गावाच्या खाली 135 किमी खोलीवर होता. भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रसपाटीपासून 10 किलोमीटर खाली होता. बंगालच्या उपसागरात एप्रिल महिन्यातही येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. 11 एप्रिल रोजी बंगालच्या उपसागरात 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
सविस्तर बातमी लवकरच ...