top of page

लग्नाच्या काही तास आधीच नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

प्रत्येकाच्या आयुष्यातील लग्नाचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. हा दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. वरात निघण्यापूर्वी मित्रांसोबत डीजेवर नाचत असताना नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर नवदेवाला तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही धक्कादायक घटना गुजरातमधील सुरत जिल्ह्यात घडली आहे.

सूरत जिल्ह्यातील अरेथ (ता. मांडवी) गावातील ३३ वर्षीय मितेश भाई चौधरी यांची वरात बालोद तालुक्यातील धामंडळा गावात जाणार होती. त्यापूर्वी बहुतांश विधी पूर्ण करण्यात आले. थोड्याच वेळात वरात निघणार होती. आनंदाच्या प्रसंगी वराचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी डीजेवर नाचत होते. मित्रांना नाचताना पाहून नवरदेव मितेशलाही नाचू वाटले. आणि तोही डीजेजवळ पोहोचला. दरम्यान, नाचत असलेल्या मितेशला त्याच्या मित्रांनी खांद्यावर उचलून घेतलं आणि नाचायला सुरुवात केली. त्यानंतर अचानक मितेशच्या छातीत दुखू लागलं.

कुटुंबीयांनी तात्काळ मितेशला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेलं.. जिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला आणि त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून बारडोली येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही माहिती मिळताच चौधरी कुटुंबावर शोककळा पसरली.


bottom of page