top of page
Writer's pictureMahannewsonline

जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा...

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) महत्वाचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉन हा काही शेवटचा व्हेरियंट नसून अजून काही नवे व्हेरियंट समोर येण्याची मोठी शक्यता असल्याचं सांगितलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रश्नोत्तराचं सत्र आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड १९ तांत्रिक प्रमुख मारिया वॅन केरखोव्ह यांनी आरोग्य संघटना ओमायक्रॉनच्या चार वेगवेगळ्या प्रकारांची माहिती घेत असल्याचं सांगितलं आहे.

“आपल्याला या व्हायरसबद्दल बरीच माहिती आहे. पण आपल्याला सर्वच माहिती नाही. खरं सांगायचं तर हे व्हेरियंट म्हणजे वाइल्ड कार्ड आहेत. उत्परिवर्तित होत असताना होणाऱ्या बदलांमुळे आम्ही व्हायरसचं रिअल टाइममध्ये ट्रॅकिंग करत आहे. या व्हायरसकडे अजूनही बाहेर पडण्यासाठी बरीच जागा आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटना भाष्य किंवा चिंता व्यक्त करत असलेला हा अखेरचा व्हेरियंट नसेल. पुढील व्हेरियंट कदाचित अजून थोडा वेळ घेईल. पण ज्या वेगाने हा पसरत आहे त्यातून नवीन व्हेरियंट येण्याची शक्यता खूप जास्त आहे,” असं त्यांनी यावेळी सांगितलं.




bottom of page