top of page
Writer's pictureMahannewsonline

WTC : भारत-न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याला आजपासून सुरुवात

साऊदम्पटन : भारत-न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ न्यूझीलंडला नमवून जगज्जेतेपद जिंकण्यास सज्ज झाला आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे भारतीयांचेच नाहीतर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतीय वेळेनुसार आज दुपारी ३.०० वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून स्टार स्पोर्ट्स वर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

आतापर्यंत भारत-न्यूझीलंड यांच्यात ५९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. २१ सामन्यात भारताने तर १२ सामन्यात न्यूझीलंड विजय मिळविला असून या ५९ सामन्यांपैकी २६ सामने हे अनिर्णीत राहीलेले आहेत. त्यामुळे कसोटीतील आकडेवारीचा विचार करता भारताचे पारडे हे न्यूझीलंडपेक्षा जड आहे.

भारतातर्फे रोहित शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुरवात करतील. तर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे या फलंदाजांवर भारताच्या मधल्या फळीची प्रमुख जबाबदारी असेल. विराट कोहली, ऋषभ पंत यांच्यामुळे भारताची फलंदाजीची फळी अधिक मजबूत दिसत आहे. इशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजांसह खेळपट्टीचे स्वरूप पाहता अश्विन आणि जडेजा या दोन फिरकी गोलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डीग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जॅमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, इजाज पटेल, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग.


bottom of page