top of page

निरोगी आरोग्यासाठी योगासन

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण स्वतःच्या शरीराकडे अर्थात आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. योग्य आहार आणि उत्तम आरोग्याचे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. योगाचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे.  निरोगी आरोग्यासाठी भारतात प्राचीन काळापासून योगा केला जातो.  दररोज नियमित योगा केल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं. ताणतणावपासून दूर राहता येते. 
तुम्ही नियमित योगा केलात तर कोणत्याही आजारापासून तुम्ही दूर राहू शकता. मात्र योगा करत असताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. योगा आपलं शरीर तंदुरूस्त ठेवण्यास मदत करतो.

योगा करण्याचे फायदे 

  • ताणतणावपासून मुक्ती

  • रोग प्रतिकारशक्तीत वाढ 

  • वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी

  • पचनक्रिया सुरळीत होते 

  • रक्ताभिसरण चांगलं होतं

  • म्हातारपणातील आरोग्य समस्या टाळण्यासाठी

योगा करत असताना लक्षात ठेवायच्या गोष्टी

निरोगी शरीर देणारा योगा आपण करण्यापूर्वी आणि करत असताना नक्की कोणत्या खास गोष्टी करायला हव्यात याची माहिती करून घेणंही गरजेचं आहे.  योग करत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

  • योगा नेहमी  सपाट जागेवर करावा 

  • योगा हा नेहमी सकाळी रिकाम्या पोटी आणि पोट साफ झाल्यानंतरच करायला हवा.

  • योग करत असताना तुम्ही शरीरावर कमीत कमी आणि सैलसर कपडे घाला.

  • योगा नेहमी मोकळ्या आणि स्वच्छ जागीच करावा.

  • योगा करताना सर्वात पहिले सोप्या आसनाने सुरुवात करावी आणि मग कठीण आसन करावं हे नेहमी लक्षात ठेवा.

  • योगा हा नेहमी एखाद्या तज्ज्ञांंच्या देखरेखीखालीच करावा किंवा तुम्हाला याचा पहिला अनुभव असेल तर तुम्ही योगा करा.

  • योगा करत असताना मध्येच अजिबात पाणी पिऊ नये.

  • योगा केल्यामुळे शरीरामध्ये खूपच उष्णता निर्माण होते त्यामुळे योगा केल्यावर लगेच आंघोळ करू नये.

  • तुम्हाला शरीरामध्ये कोणताही ताण अथवा दबाव निर्माण झाल्याचं जाणवत असेल तर हे आसन करू नका.

  • तुम्हाला अंगात ताप असेल अथवा कोणत्याही दुसऱ्या एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्ही त्या दिवशी योगा करू नये.

bottom of page