top of page

धनुरासन

शरीराला धनुष्याचा आकार प्राप्त होत असल्याने या आसनाला धनुरासन म्हणतात.

धनुरासन कसे करावे?
⬛ पायात थोडे अंतर ठेऊन पोटावर झोपा.
⬛ गुडघ्यातून पाय घडी करून हाताने घोटे पकडा.
⬛ श्वास घेत जमिनीपासून छाती वर उचला आणि पाय वर आणि मागे ढकला.
⬛ सरळ पुढे पहा.
⬛ श्वासावर लक्ष ठेऊन अंतिम स्थितीमध्ये स्थिर रहा.
⬛ तुमचे शरीर धनुष्याप्रमाणे ताठ बनले आहे.
⬛ या स्थितीमध्ये विश्राम करत खोल दीर्घ श्वास घेत रहा.
⬛ पंधरा-वीस सेकंदानंतर श्वास सोडत पाय आणि छाती जमिनीवर आणा. घोटे सोडून विश्राम करा.

धनुरासनाचे फायदे :
⬛ पाय, गुडघा व हाताचा संधिवात नाहीसा होतो.
⬛ या आसनाने शरीरातील चरबी कमी होते.
⬛ पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
⬛ छाती, गळा आणि खांदे मोकळे होतात.
⬛ पाय आणि हातांचे स्नायू बळकट होतात. पाठीची लवचिकता वाढते.
⬛ मासिक पाळीची अनियमितता आणि प्रजनन तंत्रातील तक्रारी या आसनामुळे दूर होतात.
⬛ बद्धकोष्ठता दूर होते.
⬛ मूत्र रोगांवर उपयोगी.

सावधान !
हृदयविकाराचा धोका वाढतोय

आरोग्य टिप्स

बडीशेप खाण्याने होणारे फायदे ...   

निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार

bottom of page