top of page

कोनासन

कोनासन कसे करावे
⬛ कंबरे एवढे पायात अंतर घेऊन ताठ उभे राहूया. हात शरीराजवळ असुद्या.
⬛ श्वास आंत घेत डावा हात, हाताची बोटे छताकडे करत वर उचलुया.
⬛ श्वास सोडत उजवीकडे झुकुया, पहिल्यांदा मणक्यातून, मग कंबर डावीकडे घेत आणखी झुकुया.
⬛ कोपर ताठच ठेवत मान वळऊन डाव्या हाताच्या तळव्याकडे पाहूया.
⬛ दीर्घ श्वसन सुरु ठेऊया.
⬛ श्वास घेत सरळ होऊया.
⬛ श्वास सोडत डावा हात खाली घेऊया.
⬛ उजव्या हाताने संपूर्ण आसन पुन्हा करूया.

कोनासानाचे फायदे :
⬛ शरीराच्या दोन्ही बाजू आणि मणक्याला ताण बसतो.
⬛ हात, पाय आणि पोटातील अवयव बळकट बनतात.
⬛ पाठीचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
⬛ पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते.
⬛ अपचनाच्या तक्रारी दूर होतात.
⬛ सायटिकाचे दुखणे कमी होण्यास मदत होते.

सावधान !
हृदयविकाराचा धोका वाढतोय

आरोग्य टिप्स

बडीशेप खाण्याने होणारे फायदे ...   

निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार

bottom of page