top of page

सर्वांगासन

सर्व म्हणजे संपूर्ण, अंग आणि आसन म्हणजेच संपूर्ण अंगाला समावून घेणारे आसन ते सर्वांगासन. सर्वांगासानामध्ये संपूर्ण शरीराचा तोल खांद्याच्यावर सांभाळला जातो.नांवाप्रमाणेच या आसनामध्ये सर्व शरीराचे कार्य प्रभावित होते. या आसनामुळे उच्च दर्जाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होते.


सर्वांगासन कसे करावे

⬛ जमिनीवर अंथरेल्या आसनावर शांत चित्त होऊन झोपा.
⬛ पाठीवर झोपा. संथ गतीने तुमचे पाय, नितंब आणि पाठ असे उचला की ते तुमच्या खांद्याच्या वर येतील.
⬛ तुमच्या हातांची कोपरे एकमेकांच्या जवळ आणा आणि तुमचे हात तुमच्या पाठीच्या जवळ खांद्याच्या दिशेने आणा. कोपारांना जमिनीवर आणि हातांना पाठीवर दाबून ठेवत पाय आणि पाठीचा कणा हे दोन्ही एकदम सरळ ठेवा. तुमच्या शरीराचे वजन हे तुमचे डोके व मान यावर न पेलता तुमच्या खांद्यांवर आणि हातांवर पेललेले पाहिजे.
⬛ पाय स्थिर ठेवा. तुमच्या टाचांना इतक्या वर उचला की जणू तुम्ही छतावर पाय ठेवणार आहात. पायाच्या अंगठ्याला नाकाच्या रेषेत सरळ आणा. आता पायाच्या बोटांना छताच्या दिशेने करा. तुमच्या मानेकडे लक्ष राहू द्या. मानेला जमिनीत खाली दाबू नका. त्याऐवजी मानेचे स्नायू थोडेसे आखडून घ्या त्यामुळे मान भक्कम होईल. तुमच्या छातीचे हाड/उरोस्थीला हनुवटीवर आणा. जर मानेला कोणत्याही प्रकारचा थोडासाही ताण पडत असेल तर ताबडतोब हे आसन सोडा.
⬛ खोल श्वास घ्या आणि या आसनामध्ये ३०-६० सेकंद राहा.
⬛ हे आसन सोडण्यासाठी प्रथम गुडघ्यांना कपाळाच्या दिशेने आणा. हातांना जमिनीवर आणा, हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने. डोके न उचलता एक एक मणका करीत पाठीचा कणा संपूर्णपणे खाली आणा. पायांना जमिनीवर आणा. ६० सेकंद आराम करा.

सर्वांगासनाचे फायदे

⬛ हात आणि खांदे यांना बळकट होतात
⬛ पाठीचा कणा लवचिक बनतो.
⬛ दमा, लट्ठपणा, कमजोरी व थकवा दूर होतो.
⬛ थायरोईड आणि पॅराथायरोईड ग्रंथींचे कार्य कार्य सुधारते.
⬛ मेंदूला अधिक रक्तपुरवठा मिळाल्यामुळे त्याचे चांगले पोषण होते.

सावधान !
हृदयविकाराचा धोका वाढतोय

आरोग्य टिप्स

बडीशेप खाण्याने होणारे फायदे ...   

निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार

bottom of page