top of page

ताडासन

ताडासन कसे करावे

⬛ दोन्ही पायांमध्ये एक फूट अंतर ठेवावं.
⬛ दोन्ही हात शरीरालगत असावे.
⬛ शरीर ताठ असावे आणि शरीराचं वजन दोन्ही पायांवर समांतर असावे.
⬛ आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर करावेत.
⬛ वर नेल्यावर हातांची बोटं एकमेकांत गुंफवा.
⬛ आता जेवढा हातांना स्ट्रेच देता येईल तितका द्यावा.
⬛ नंतर दोन्ही पाय म्हणजेच टोजवर उभं राहावं.
⬛ या आसनस्थितीत काही वेळ थांबावं.
⬛ आसन सोडताना प्रथम हातांना रिलॅक्स करावं मग पाय खाली आणावेत.
⬛ थोडा वेळ विश्रांती करून पुन्हा हे आसन करावं.
⬛ हे असं करताना दोन्ही हातांना डोक्याच्या दिशेला नेताना श्वास घ्यावा. आसनस्थितीत नॉर्मल श्वास असावा. दोन्ही हात खाली आणताना श्वास सोडावा.

ताडासनाचे फायदे :

⬛ पोट आणि पाठीवरील फॅट्स (चरबी) कमी होते.
⬛ हे आसन नियमित केल्याने उंची वाढते.
⬛ हात, खांदा आणि पाय यांना चांगलाच ताण मिळतो.
⬛ शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत होते.
⬛ एकाग्रता वाढते.

सावधान !
हृदयविकाराचा धोका वाढतोय

आरोग्य टिप्स

बडीशेप खाण्याने होणारे फायदे ...   

निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार

bottom of page