top of page

वीरभद्रासन

वीरभद्र नावाच्या आक्रमक योद्ध्याचे नाव ह्या आसनाला दिले गेले आहे. वीरभद्र हा शिवाचा अवतार मानला जातो. उपनिषदातील सर्व गोष्टींप्रमाणे वीरभद्राच्या गोष्टीमध्येही नैतिक मुल्यांचा समावेश आहे.हे आसन, हात, खांदे, गुडघे, मांड्या आणि कंबरेच्या मसल्स मजबूत बनवण्यात मदत करते.

वीरभद्रासन कसे करावे?
⬛ सरळ उभे रहा. दोन्ही पायांत ३-४ फूट अंतर असू द्या.
⬛ उजवा पाय ९० अंश बाहेरच्या बाजूस वळवा व डावा पाय १५ अंश.
⬛ दोन्ही हात उचलून खांद्यांच्या रेषेत आणावे, हाताचे तळवे वरच्या दिशेस.
⬛ श्वास सोडा आणि उजवा गुडघ्यातून वाका..
⬛ तुमचा उजवा गुडघा आणि घोटा एका रेषेत आहे का? उजवा गुडघा उजव्या घोटेच्या पुढे नाही ना ह्याची दक्षता घ्या.
⬛ उजवी कडे वळून पहा.
⬛ आसनात स्थिर होताच हात आणखी ताणून घ्या.
⬛ कंबर आणखी थोडी खाली दाबायचा हलकासा प्रयत्न करा. एका योध्याच्या जिद्दीने आसन स्थिर ठेवा. चेह-यावर प्रसन्न भाव असू द्या. खाली वाकताना श्वासोच्छवास चालूच ठेवा.
⬛ श्वास घेत सरळ व्हा.
⬛ श्वास सोडता सोडता दोन्ही हात खाली आणा.
⬛ अगदी अशाच प्रकारे डाव्या बाजूसही करा. (डावा पाय ९० अंश बाहेरच्या बाजूस वळवा व उजवा पाय १५ अंश.)

वीरभद्रासनाचे फायदे :
⬛ हात पाय आणि पाठीच्या स्नायूंना बळकटी येते व ते सुडौल बनतात.
⬛ खांद्यांचा ताठरपणावर अतिशय उपयुक्त.
⬛ खांद्यांमधला ताण कमी होतो.
⬛ शरीर संतुलित राहते व काम करण्याची क्षमता वाढते.

सावधान !
हृदयविकाराचा धोका वाढतोय

आरोग्य टिप्स

बडीशेप खाण्याने होणारे फायदे ...   

निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार

bottom of page