top of page
Writer's pictureMahannewsonline

... पण उपमुख्यमंत्री आम्हाला पाहिजे तेवढी साथ देत नाहीत

यशोमती ठाकूर यांचा भर कार्यक्रमात अजित पवार यांच्याबद्दल व्यक्त केली नाराजी

अकोला : महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. बालसंगोपन निधी अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात मंचावर उपस्थित होते.अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यात आयोजित अन्यायग्रस्त शेतकरी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी समोर आली आहे.

अकोला जिल्ह्यातील बालापूर तालुक्यामधील पारसफाटा येथे झालेल्या अन्यायग्रस्त शेतकरी संवाद कार्यक्रमात यशोमती ठाकूर बोलत होत्या. यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहून म्हणाल्या की, “बालसंगोपनाचे पैसे कित्येक वर्षांपासून वाढलेले नव्हते. त्यांना ४५० रुपये मिळत होते. आपण हे वाढवून ११२५ रुपये केले आहेत. पण माझी अशी इच्छा आहे की, किमान त्यांना २५०० रुपये त्या लेकरांना द्यायला हवे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. पण उपमुख्यमंत्री आम्हाला पाहिजे तेवढी साथ देत नाहीत. तुम्ही जर बोललात तर साथ मिळेल,” असं यशोमती ठाकूर यांनी यावेळी म्हटलं.


bottom of page