top of page
Writer's pictureMahannewsonline

व्हिडीओ पाहा : युवराज सिंगने पुन्हा केला षटकारांचा वर्षाव...

Updated: Mar 14, 2021

युवराज सिंग, सचिन तेंडुलकरची धडाकेबाज खेळी


मुंबई : रोड सेफ्टीसाठी क्रिकेट मध्ये आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर झाला. आज झालेल्या या सामन्यात सिक्सर किंग युवराज सिंगने पुन्हा एकदा एकाच ओव्हरमध्ये सलग ४ षटकार खेचत तुफानी फलंदाजी केली. युवराजच्या या फलंदाजीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.

आजच्या सामन्यात भारताने प्रथम प्रथम फलंदाजी करताना ३ गड्यांच्या मोबदल्यात २०४ धावा केल्या. सचिन तेंडुलकरने धडाकेबाज सुरुवात करुन दिली. सचिनने फक्त ३७ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६० धावांची खेळी साकारली. सचिन बाद झाल्यावर मैदानात युवराज सिंगने अवघ्या २२ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ५२ धावांची तुफानी खेळी केली. यावेळी युवराजने एकाच षटकात तब्बल चार षटकार लगावल्याने जुना युवराज पुन्हा मैदानात परतल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे चाहत्यांना युवराजने दक्षिण आफ्रिकेत एकाच ओव्हरमध्ये खेचलेल्या सहा षटकारांची आठवण झाली. भारतीय संघाने यावेळी निर्धारित २० षटकांमध्ये तीन फलंदाज गमावत २०४ धावा केल्या.


२०४ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकात ७ बाद १४८ धावाच करता आल्या. भारताने हा सामना ५६ धावांनी जिंकला. युवराज सिंगने २ बळी तर युसूफ पठाणने ३ बळी घेतले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

bottom of page